Skip to main content

Posts

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

शासनाच्या योजना गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे यासाठी बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष यांची आदर्श कामगिरी

मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात ठसा उमठविलेले मा.श्री.राजकुमार शंकरराव हिवरकर-पाटील बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) माळशिरस जि.सोलापूर यांनी शिवसेना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी घेतले पासून विविध प्रश्नावर लक्ष देवून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कर्तव्यदक्षपणे जबाबदारी पार पाडीत आहेत. जनतेच्या हिताचे प्रश्न मार्गी लावत आहेत. त्यांची कामगिरी आदर्श ठरत आहे. त्यांच्या कामगिरीचे कौतुक जनतेकडून होत आहे. पक्षाचे काम जोमाने करीत आहेत. पक्ष वाढीसाठी वेळ , पैसा खर्च करीत आहेत. शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत आहेत. प्रधानमंत्री आयुष्मान भारत व महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात यावी यासाठी मा.वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय नातेपुते , मुख्याधिकारी नगरपंचायत , नातेपुते , मा.जिल्हा समन्वयक डॉ.रवी भोपळे सोलापूर , तालुका वैद्यकीय अधिकारी माळशिरस यां...

वाखरी गावाला जोडणारे रस्ते तात्काळ दुरुस्त करून ग्रामस्थांचे हाल थांबवावे : वाखरी ग्रामसभेत ग्रामस्थांची मागणी

संपादक : पंढरपूर साप्ताहिक बहुजन भूषण मिळालेल्या माहितीनुसार - वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर ग्रामपंचायत कार्यालय येथे विशेष ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनी मतदान ओळख पत्र आधारकार्ड सोबत लिंक करून घ्यावे असे आवाहन ग्रामपंचायतने केले. ही ग्रामसभा सरपंच धनश्री तानाजी साळुंखे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ग्रामस्थांनी वाखरी ते कोर्टी , वाखरी ते शिंदेवस्ती या रस्त्याची दुरूस्ती करून ग्रामस्थांना होणारा त्रास थांबविण्यात यावा अशी मागणी केली गेली. वाखरी गावाला जे जोडले गेलेले रस्ते म्हणजे वाखरी ते कोर्टी रस्ता तसेच वाखरी ते शिरढोन रस्ता पुर्णपणे उखडला असून ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच वाखरी ते शिंदेवस्ती रस्त्याचा प्रश्न ग्रामपंचायत अस्तीत्वात आले तेव्हापासून ते आजतागायत मार्गी लागलेला नाही. त्यामुळे शिंदे वस्तीच्या ग्रामस्थांचे प्रचंड हाल होत आहेत. त्वरित रस्त्याची दुरूस्ती करून रस्ता बनवण्यात यावा. रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. या रस्त्यावरून येणे-जाणे अवघड झाले आहे. या रस्त्यावरून वयोवृद्ध , महिला , पुरुष , शाळकरी मुलांचे हाल होत आहेत त्या...

नामजपामुळे माणसं एकत्रित येण्याचे पवित्र काम : विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           कारुंडे (लोंढेवस्ती) ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे चैतन्य जप प्रकल्पाचे २२ वे राज्यस्तरीय शिबीर आयोजित केले होते. या नाम जपामुळे माणसं एकत्र येतात. व्यसनाच्या आहेरी गेलेली , बिघडलेली , जातीपातीत द्वेष, मत्सर, भेदभाव होत आहेत तो या नामजपामुळे नाहीसे होऊन आम्ही सारे बांधव आहोत हाच संदेश यामधून मिळतो आहे. नामजपाच्या माध्यमातून माणसे घडविण्याचे काम केले जाते. सामाजिक समतोल यामधून राखला जातो. संत ज्ञानेश्वर महाराज, ब्रम्हचैतन्य महाराज यांनी दिला आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी परमपूज्य शिवानंद भारती महाराज, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहते-पाटील, माजी जिल्हा परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यानिमित्त ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रतिमेची हत्तीवरून शोभा यात्रा काढली. तसेच पुढे रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, माणूस हा सध्या लोभी झाला आहे, त्याला हाव सुटली आहे असे असताना त्यामध्ये ते समाधान...

वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे दर महा पन्नास हजार युनिटची चोरी मीटर धारकांना बसतोय फटका

संपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र वाखरी :           वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर या गावी मोठ्या प्रमाणात आकडे टाकून प्रकाशाचा आनंद घेणारे वीज चोरी धारक आहेत. रात्रंदिवस आकडे टाकून वीज चोरी करून मजेत राहत आहेत. ही वीज चोरी वाखरी येथील स्मशानभूमी , बागवान वस्ती , रामोशी समाज , वाडी-वस्ती इ. ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे. वाखरी गावात जे वीज वितरण कंपनीचे जे कर्मचारी आहेत ते "आंधळे” आहेत. त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधली आहे. त्यांना वीज चोरी करणारे वीज चोर दिसत नाहीत. त्यांना वीज चोरी करणार्‍याकडून दर महिना हफ्ते आहेत असे वाटते. वीज चोरी करणारे चोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी यांना दिसत नाही. परंतु एखाद्या मीटर ग्राहकाचे वीज बिल थकले की , हे कर्मचारी त्वरित वीज कट करतात. तसेच २६-०९-२०२२ रोजी पत्र जा.क्र.५५५ वीज वितरण कार्यालय शाखा अभियंता गादेगाव ता.पंढरपूर यांना वीज चोरी बाबत बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य अभिमन्यु बी. आठवले यांनी पोस्टाने पत्र पाठविले आहे. तरीपण अधिकारी यांनी दखल घेतलेली नाही असे दिसून आले आहे. वाखरी येथील वी...

अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून "वकील" होण्याचे स्वप्न मा.विजय रामचंद्र काळे यांनी पूर्ण केले

अॅड.मा.विजय रामचंद्र काळे उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील अॅड.मा.विजय रामचंद्र काळे VJNT (A) वडार या समाजाचे असून या समाजातील पहिले वकील म्हणून आदर्श ठरले आहेत. घरची परिस्थिती दयनीय असताना त्यांनी वकील होण्याचे स्वप्न मनाशी बाळगले होते. त्यांनी M.Com, L.L.B. GDC&A असे शिक्षण घेतले आहे. त्यांनी प्रियदर्शनी लॉं कॉलेज फलटण येथून L.L.B. चे शिक्षण घेतले. ते शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर येथून उत्तीर्ण झाले.  अॅड.विजय काळे एल.एल.बी. उत्तीर्ण झालेबद्दल साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे उपसंपादक वैभव आठवले त्यांचा सत्कार करताना  १० वी, १२ वी चे शिक्षण डॉ.बा.ज.दाते प्रशाला , नातेपुते येथून झाले. शिक्षणासाठी विशेष मदत त्यांचे बंधु किरण रामचंद्र काळे यांनी केले. L.L.B. उत्तीर्ण होण्यासाठी विशेष सहकार्य मोरे सर , शिंदे मॅडम , शमा बांदल मॅडम यांचे मिळाले. ते वडार समाजातून पहिले वकील झाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. व त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.     बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपाद...

नातेपुते पोलिस स्टेशन कडून पत्रकार यांना दीपावलीनिमित्त वही, पेन व मिठाई तसेच पोलिस पाटील यांनाही मिठाईचे वाटप करण्यात आले

उपसंपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र           नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील सर्व पत्रकार व पोलिस पाटील यांना दिवाळीनिमित्त मिठाईचे वाटप करून दीपावली गोड करून सर्वांना शुभेच्छा नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी मा.प्रवीण संपांगे साहेब यांनी दिल्या. पत्रकार व पोलिस पाटील यांना मिठाईचे वाटप करून पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे. निमित्त दीपावलीचे परंतु या उपक्रमातून एकमेकांची भेट , ओळख , संवाद हा या मागील हेतु आहे. एक तर पोलिस खाते यांची नोकरी म्हणजे सदैव जागृत रहावे लागते , जनतेचे हित पहावे लागते असेच असते. पोलिस खाते हे जनतेचा आधार समजला जातो. परंतु मनात आणले तर पोलिस बांधवांचेच कुटुंब निराधार आणि जनतेला मात्र आधार असे समीकरण असते.  साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक मा.श्री.डॉ.अभिमन्यु बी. आठवले नातेपुते पोलिस स्टेशनचे गोपनीय कर्मचारी गणेश कापसे साहेब यांचेकडून दीपावलीनिमित्त मिठाई स्वीकारताना       पोलिस खातेकडे बघत असताना काहींना पोलिस खाते म्हणजे दुश्मन असेच वाटते. परंतु त्यांची नोकरी म...

दहिगाव ता.माळशिरस जि.सोलापूर येथील ग्रामस्थांना दूषित पाणी पुरवठा केला जात आहे त्यामुळे मनुष्यहानी होण्याची दाट शक्यता आहे स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा असे गट विकास अधिकारी पंचायत समिती माळशिरस यांनी त्वरित लक्ष घालावे: बाबुराव मारुती खिलारे (भाजप अनुसूचीत जाती मोर्चा माळशिरस तालुका अध्यक्ष)

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण           मिळालेल्या निवेदनावरून दहिगाव ता.माळशिरस , जि.सोलापूर येथे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक कर्णे हे असून ते कामात कुचराई व बेफिकीर असून कामात हलगर्जीपणा करीत आहेत. गावातील ग्रामस्थांनी भेटून सुद्धा ग्रामसेवक टाळाटाळ करीत आहेत , दखल घेत नाहीत . वारंवार दूषित पाण्याबाबत ग्रामसेवक यांच्याकडे तक्रार करून ही गेली तीन वर्षे ग्रामस्थ व्यथा वेदना मांडत आहेत. परंतु ग्रामसेवक कर्णे लक्ष घालून ग्रामस्थांना स्वच्छ कसा पाणी पुरवठा होईल यासाठी झटत नाहीत. या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थ आजारी पडत आहेत. ग्रामसेवक हा जनतेचा लोकसेवक आहे. त्याने राजकारणापासून दूर राहिले पाहिजे. तो सरकारी नोकरदार आहे. तो गावात मोठ्या प्रमाणावर राजकारण करीत आहे असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवक कर्णे याची दफ्तर तपासणी झालेली नाही. ती जिल्हा अधिकारी साहेब सोलापूर यांनी तात्काळ करावी व त्यांच्यावर खाते अंतर्गत कारवाई करण्यात यावी. गावाला स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात यावा. गाव रोगमुक्त राहील याची काळजी घ्यावी. या दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांचे बर...