Skip to main content

Posts

Showing posts from June, 2025

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

वाखरी ग्रामपंचायतकडून आषाढी वारी २०२५ च्या अनुषंगाने जय्यत तयारी

  संपादक: अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      या वर्षीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व इतर शेकडो संतांच्या पालख्या वाखरी तळावर गाठीभेटी घेऊनच पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्त होत असतात.     वाखरी या गावी संत लक्ष्मणदास महाराज होऊन गेले आहेत. त्यांचा दगडी रेखीव, कोरीव असा मठ आहे, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी ग्रामपंचायतने येणाऱ्या भाविकांसाठी बाजीराव विहीर येथील रिंगण स्थळ स्वच्छ केला आहे.       त्या ठिकाणी हिरकणी कक्ष, आरोग्य केंद्र, पिण्याचे पाणी पुरवठा नियोजन केले आहे. तसेच वाडी वस्तीवर वीज पुरवठा, फॉशिंग करणे, महिला स्नान गृह, सार्वजनिक स्वच्छता, तात्पुरते शौचालय, जिल्हा परिषद अंतर्गत दिशादर्शक फलक, हिरकणी कक्ष, इस्त्री कक्ष, पाय दाबन्यासाठी मशीन व्यवस्था, तात्पुरता दवाखाना, कटिंग, दाढी कक्ष, इत्यादी विविध सुविधा वाखरी ग्रामपंचायतकडून राबविण्यात आल्या आहेत.       यासाठी वाखरी ग्रामपंचायत चे सरपंच, उपस...

नातेपुते पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची आदर्श कामगिरी चंदन चोरी करणा-या आरोपीस २४ तासात केले जेरबंद

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे मांडवे, ता.माळशिरस येथे राजन सुकुमार दोशी यांचे शेतातील दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ०८/०० वा ते सायंकाळी ०५/००वा. चे दरम्यान शेतातील बांधावरील १० वर्षे वयाची ०२ चंदनाची झाडे अंदाजे किंमत २७,०००/- रू चे कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहेत त्याबाबत फिर्यादी नामे राजन सुकुमार दोशी रा.नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २३७/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दिनांक २६/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास पोहेकॉ/१७०८ विकास बाबर हे करीत होते.      नातेपुते पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सदर गुन्हयाचा तपास दरम्यान मिळालेल्या गोपनिय बातमीव्दारे माहीती काढून इसम नामे १) गोविंद दुर्याधन काळे २) मेघराज ज्ञानदेव भोसले दोघे रा माळशिरस यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यास पोहकॉ/१७०८ बाबर व गुन्हे प्रकटीक...

अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून धर्मतुरी, ता.माळशिरस रोडलगत वृक्षारोपण

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार       दिनांक 26/06/2025 रोजी मा. श्री. अतुल कुलकर्णी साहेब पोलीस अधीक्षक ,सोलापूर ग्रामीण यांच्या संकल्पनेतून  व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नारायण शिरगावकर उपविभाग माळशिरस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या हरित वारी सन 2025 उपक्रमांतर्गत  नातेपुते पोलीस  ठाणे हद्दीतील  मौजे धर्मपुरी येथे  पालखी मार्गवर हरितवारी अनुषंगाने, माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी साहेब, यांच्या हस्ते रोडलगत वृक्षारोपण करण्यात आले.       सदर ठिकाणी वृक्षारोपण करिता गावातील सरपंच,शेतकरी व गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच  पोलीस पाटील, पोलीस मित्र, ग्राम सुरक्षा दल यांच्या उपस्थितीत हरित वारी उपक्रम संपन्न झाला आहे. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति साम...

आषाढी वारी 2025 च्या पार्श्वभूमीवर नातेपुते बस स्थानक याठिकाणी मॉक ड्रिल प्रात्यक्षिक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 25/06/2025 रोजी नातेपुते, माळशिरस या ठिकाणी आषाढी वारी 2025 च्या अनुषंगाने दहशतवादी हल्ल्याचेवेळी करण्यात येणाऱ्या कारवाईबाबत व उपाय योजना बाबत नातेपुते बस स्टँड परिसर येथे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली मॉक ड्रिल  घेण्यात आली.  मॉक ड्रिल करिता पोलीस स्टेशन स्टाफ, क्यू.आर.टी. पथक, आर.सी.पी.पथक, BDDS पथक सो ग्रामीण,  उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय पथक, अग्निशमक पथक असे संयुक्त मॉक ड्रिल घेण्यात आले. यावेळी नातेपुते पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक बसवेश्वर जकीकोरे यांच्या उपस्थितीत सदरची मॉक ड्रिल 13/14  सुरु करून 14/16 ला समाप्त करण्यात आली. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य टीप : जे दिसले ,  जे पाहिले तेच लिहिले हेच...

वाखरी ग्रामपंचायत ने नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन टाकून "घर तेथे नळ "ही पाणीदार योजना ग्रामस्थांच्या हितासाठी राबविली

संपादक: अभिमन्यू आठवले, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र       वाखरी ता.पंढरपूर, जि.सोलापूर या गावात ग्रामपंचायतने राबविलेली एक आदर्श नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे "घर तेथे नळ "ही पाणीदार योजना ग्रामपंचायतने राबवून ती ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने आदर्श ठरली आहे.       या पाणी पुरवठा योजनेमुळे मोटार लावून पाणी भरावे लागत होते, त्यामुळे भरपूर युनिट जळत होते, वीज बिल प्रचंड येत होते, त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आर्थिक नुकसान भरपूर होत होते हे ग्रामस्थांना परवडणारे नव्हते त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते, परंतु इलाज नव्हता.     वाखरी ग्रामपंचायतने नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन वाडी, वस्ती, गाव इत्यादी ठिकाणी राबवून ग्रामस्थांना आधार मिळाला. तसेच ही योजना कोणाच्या काळात मंजुरीसाठी पाठवली, कोणाच्या काळात मंजुरी मिळाली, कोणाच्या काळात राबविली गेली, तसेच यासाठी आमदार, खासदार, झटले हा विषय श्रेय घेण्याचा नाही. या योजनेसाठी शासनानी भरीव असा निधी दिल्यामुळे ही योजना नावारूपाला आली. सध्या मोटार न लावता पाणी १० ते १५ फुटापर्यंत प...

आषाढी वारी अनुषंगाने सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

प्रशिक्षणार्थी यांना हिरवा झेंडा दावून रवाना करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे सपोनी महारुद्र परजणे उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)      आषाढी वारी अनुषंगाने सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातून महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स मधील कमांडो यांना कोलाड ( रायगड ) या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या बारा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.       यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी कोलाड ( रायगड ) येथे प्रशिक्षणासाठी निघालेल्या बसचे पूजन करून प्रशिक्षणासाठी निघालेल्या कमांडो व आपदा मित्र यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व हिरवा झेंडा दाखवून प्रशिक्षणार्थ्याची बस रवाना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनचे अधिकारी मनोज राऊत, यश करिअर अकॅडमीचे अनिल माने तसेच कमांडो व अपदा मित्र उपस्थित होते.       या प्रशिक्षणामध्ये...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अनुषंगाने पोलीस विभागाकडून मार्ग पाहणी व बंदोबस्त आढावा

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार      आज नातेपुते पोलीस ठाणे (माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर, ग्रामीण), श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी, सातारा जिल्हा बरड येथे दिनांक 29/06/2025 रोजी मुक्काम करून दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजताचे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. त्यावेळी मोठ्या उत्साहामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील भाविक भक्तांचे मोठ्या संख्येने प्रशासन व जनतेच्या वतीने स्वागत केले जाते.        जिल्हा सातारा येथून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत पालखीतील भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पालखीतील प्रसादाची वाहने सुरळीत वेळेत पालखीतळावर पोहोच व्हावीत, वाहतूक नियमन, भाविक भक्ताची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था, अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस मार्फत 1600 पोलीस बंदोबस्त लावला जातो. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1050 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला ...