नातेपुते नगरपंचायतमध्ये सामाजिक क्षेत्रात ठसा उमटविलेले मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड
मा.श्री.अविनाशजी दोशी ( संस्थापक) सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा समिती उपसंपादक वैभव आठवले नातेपुते ता.माळशिरस जि.सोलापूर येथील सन्मती सेवा दल व अहिंसा सेवा समिती या सामाजिक संघटनेचे संस्थापक मा.श्री.अविनाशजी दोशी साहेब यांची नातेपुते नगरपंचायतच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली. त्यांचे आदर्शवादी सामाजिक कार्य म्हणजे पुरोग्रस्तांना मदत , कोव्हिड-१९ कोरोना काळात अन्नदान , रंजल्या गांजल्यांना मदत , वृक्षारोपण , रक्तदान शिबीर , शिंगणापुर येथील वानरांना टेम्पोने केळी भरून जगण्यासाठी आधार दिला. विविध सामाजिक ठिकाणी CCTV कॅमेरे , पानपोई असे विविध उत्कृष्ट सामाजिक कामे करून ठसा उमटविला आहे. उच्च शिक्षित , व्यवसायधारक व दयाळूपणाची भूमिका अशी आहे. सामाजिक क्षेत्रात योगदान अतिशय महत्वाचे आहे. ते अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. काही वर्षापूर्वी नातेपुते ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते परंतु त्यामध्ये अपयश आले. जनतेने दिलेल्या मताचा कौल स्वीकारून पराभव मान्य केला. खचून न जाता आपले सामाजिक काम पुढ...