Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र व्यवसायधारकांच्या व्यवसायाची माहिती सर्वत्र पोहचवण्यासाठी “वरदान” ठरले आहे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...! तसेच १ जानेवारी भीमाकोरेगाव येथील विजय स्तंभास विनम्र अभिवादन...!

१ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ     संपादक      संस्थापक संपादक साप्ताहिक बहुजन मित्र व साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र व्यवसाय धारकांच्या व्यवसायाची माहिती ग्रामीण , शहर , वाडीवस्ती याठिकाणी पोहचत असल्यामुळे या वृत्तपत्राने व्यवसायधारक , वाचक , जाहिरातदार , सामाजिक , राजकीय नेतेमंडळी यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे. “ ना नफा ना तोटा” या धरतीवरती व्यवसायधारकांच्या मदतीला , पाठीशी , उभे राहणारे वृत्तपत्राने नावलौकिक मिळविला आहे. शासकीय , निमशासकीय कार्यालय व घराघरात हे वृत्तपत्र पोहचत आहे. संपादकाची असलेली “शोधपत्रकारिता” यानुसार आजूबाजूला घडणार्‍या घटना त्यावरती रोखठोक , सडेतोड , मवाळवादी तर कधी जहालवादी लेखणीद्वारे सर्व सामान्य मानसापर्यंत विचाराची शिदोरी पोहचवत आहेत. विविध विषयावर लिखाण करून समाजजागृतीचे काम करीत आहे. हे वृत्तपत्र जनतेमुळे नावारूपाला आले आहे. या वृत्तपत्रातील जाहिरातीमुळे व्यवसायधारकांची माहिती तळागाळापर्यंत पोहचत असल्यामुळे या वृत्तपत्राकडे व्यवसायधारक व्यवसायाची जाहिरात देवून वृत्तपत्राला “आशीर्वाद व बळ” देत आहेत. जाहिरात...

राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेबांच्या जाहीर सभेमुळे नातेपुते नगरपंचायत मधील मतदारांमध्ये नवचैतन्य, रात्र वैर्‍याची आहे मतदारराजांनी जागृत राहून मतदान करावे असे जानकर साहेबांचे मतदारांना आवाहन

  मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब ( माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) संपादक           नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यामुळे व सार्वत्रिक निवडणुका २०२१-२२ या कालावधीमध्ये लागल्यामुळे व प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब यांची जाहीर सभा २०/१२/२०२१ रोजी संपन्न झाली. मतदार राजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. मतदारांनी आपले पवित्र मत राष्ट्रीय समाजपक्षाचे व महाराष्ट्र विकास आघाडीचे समाजभूषण पॅनेलच्या उमेदवारांना दिले पाहिजे अशी मानसिकता मतदार राजांची झाली आहे. ही सभा अण्णाभाऊ साठे चौक , नातेपुते येथे संपन्न झाली. यावेळी प्रचंड महिला व पुरुष मतदार उपस्थित होते. डोक्यावरती उन्हाचा तडका बसत असतानाही जानकर साहेबांची सभा ऐकण्यासाठी जागृत मतदार प्रचंड प्रमाणात उपस्थित होते. जानकर साहेबांनी जनतेला आवाहन केले की , रात्र वैर्‍याची आहे जागे रहा , आमिषाला बळी पडू नका , जो कोणी उमेदवाराला , मतदाराला धमकी देईल त्या धमकीला धमकीनेच उत्तर दिले जाईल. मतदार राजाने आपले पवित्र मत राष्ट्रीय समाजपक्ष ...

नातेपुते नगरपंचायत निवडणूक २०२१ च्या प्रचारानिमित्त राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची दि.२०/१२/२०२१ रोजी जाहीर सभा

मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री ,  महाराष्ट्र राज्य) संपादक दि.२०/१२/२०२१ रोजी वार सोमवार या दिवशी ठीक सकाळी १०.००वा. अण्णाभाऊ साठे चौक, नातेपुते येथे राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री , महाराष्ट्र राज्य) यांची जाहीर सभा होत आहे. नातेपुते नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाजपक्षाने आपले पक्षातर्फे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय समाजपक्षाचे उमेदवार हे विजयी होऊन नातेपुते नगरपंचायतमध्ये प्रवेश करतील अशी अपेक्षा मतदारांमधून होत आहे. राष्ट्रीय समाजपक्षाने उमेदवार दिल्यामुळे जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे मतदारांना हा पर्याय योग्य वाटत आहे. तसेच या राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.महादेवरावजी जानकर साहेब हे निस्वार्थीपणे व जनतेच्या हितासाठी लढा देण्यासाठी व जनतेच्या हक्कासाठी लढणारे व्यक्तिमत्व आहे. ते एक अभ्यासू , तळागाळातील जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा.महादेवरावजी जानकर साहेब होय. स्वच्छ प्रतिमा असलेले , बहुजनसमाजप्रिय अ...

राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेबांनी पत्रकारांच्या कुटुंबातील माताभगिनींना उमेदवारी देवून एक आदर्श निर्माण केला

  मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब  (माजी कॅबिनेट मंत्री)   संपादक           नातेपुते ता.माळशिरस येथील ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यामुळे व निवडणुका लागल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाचे या निवडणुकीत उमेदवार उभे करण्यासाठी जानकर साहेबांनी नातेपुते येथे कार्यकर्ते व मतदार यांच्या गाठी घेवून तळागाळातील बहुजन समाजातील व्यक्तींना उमेदवारी देवून सन्मान केला. उमेदवारांचे अर्ज दाखल होताच उमेदवारांच्या घरी जाऊन मा.श्री.माजी कॅबिनेट मंत्री महादेवरावजी जानकर साहेब यांनी उमेदवारांच्या घरी जाऊन भेटी दिल्या व उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. तसेच 15/12/2021 रोजी नातेपुते येथे प्रचाराचा शुभारंभ जानकर साहेबांच्या उपस्थितीत उमेदवार उभे असलेल्या प्रभागात झंजावती दौरा करून लहान थोर यांना आदराने आपले पवित्र मत माझ्या उमेदवारांना द्या. जानकर साहेब मतदारांच्या घरापर्यंत गेल्यामुळे नेता असावा तर असा अशी चर्चा सर्व नातेपुते नगरीतील बांधव करीत आहेत. तसेच जानकर साहेबांना अध्यक्ष शाहिद मुलाणी , श्रीकांत बावीस्कर व कार्यकर्ते यांनी सांगितले...

राष्ट्रीय समाज पक्षानी नातेपुते ता.माळशिरस नगरपंचायतच्या २०२१ च्या निवडणुकीत तोलामोलाचे उमेदवार निवडणूक लढवित असल्यामुळे विरोधकांमध्ये वाढली धाकधूक

  मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब  (माजी कॅबिनेट मंत्री) संपादक           नातेपुते ता.माळशिरस , जि. सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्यामुळे व निवडणूक लागल्यामुळे संस्थापक माजी मंत्री मा.महादेवरावजी जानकर साहेब त्यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून सहा उमेदवार विविध प्रभागात निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने सर्व धर्म समभाव असे उमेदवार दिल्यामुळे मतदारामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच दिनांक ०७/१२/२०२१ व १२/१२/२०२१ रोजी संस्थापक माजी मंत्री मा.महादेवरावजी जानकर साहेबांनी नातेपुते नगरपंचायत निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या आहेत. मन मोठे असलेला एक आदर्श नेता म्हणजे महादेवरावजी जानकर साहेब आहेत. आमदार नामदार झाले परंतु पाय जमिनीवर ठेवून कार्यकर्त्यांच्या पाठीशी     खंबीरपणे उभे राहत आहेत. तसेच या पक्षातील कार्यकर्ते सुद्धा मनमिळाऊ आहेत. प्रत्येकांचा आदर करतात. साहेब लहान असो वा मोठा त्यांचा आदर करतात. मी संपादक म्हणून साहेबांकडे पाहिले...

६ डिसेंबर घटनेचे शिल्पकार प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण अभिवादन दिवस, १ जानेवारी भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन दिवस, १४ एप्रिल भारतरत्न प.पु. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस जयंती या उत्सवांना सरकार रोगाच्या आपत्तीचे निमित्त पुढे करून भीम सैनिकांना रोकण्याचे एक षड्यंत्र रचत आहे असे चित्र दिसते

संपादक           गेल्या दोन वर्षापासून ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण अभिवादन दिन बाबांचा असतो. तर १ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभ अभिवादन दिवस असतो. तर बाबांचा जन्म दिवस १४ एप्रिल असतो. या निमित्ताने अभिवादन करण्यासाठी व बाबांची जयंती साजरी करण्यासाठी भीम सैनिकांच्या आनंदाला उधाण येत असते. तो सण समजला जात असतो. प्रत्येक वर्षी सरकार ह्या कार्यक्रमांना रोगाच्या आपत्तीचे कारण पुढे करून भीम सैनिकांना घरातूनच अभिवादन , जयंती उत्सव साजरे करायला सांगते. भीम सैनिकांनी आपले शक्ति प्रदर्शन दावू नये , बाबांविषयी असलेली श्रद्धा व दैवत आहे. यावरती सरकार रोगाचे निमित्त करून नियम दाखविले जाते आहे. राजकर्त्यांनो तुमचे मेळावे होतात , तुमचे सण साजरे होतात , निवडणुका घेता , मंदिरे उघडली गेली , नाट्यगृह , तमाशा , नाटक , शाळा , हॉटेल इ. सुरू केले यावरती का बंधने घातली जात नाहीत.           ६ डिसेंबर , १ जानेवारी , १४ एप्रिल आले की भीम सैंनिकांना रोकण्याचे काम सरकार करत आहे. भीम सैनिक कायद्याचा मान सन्...