Skip to main content

Posts

Showing posts from September, 2021

महाराष्ट्र सरकारने डोक ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावेत आरोग्य विभागाच्या २५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेतल्या जाणार्‍या परीक्षा रद्द का झाल्या? त्याची चौकशी झाली पाहिजे, विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळू नये याबाबत सरकारने खबरदारी घ्यावी

संपादक             दि.२५/०९/२०२१ व २६/०९/२०२१ रोजी घेण्यात येणार्‍या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड मधील विविध पदाच्या परीक्षा रद्द   करण्यात आल्या त्यामुळे विद्यार्थी पालक यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. परीक्षा असल्यामुळे विद्यार्थी यांनी आपआपल्या परीने परीक्षा देण्यासाठी , वेळेत पोहोचण्यासाठी काही विद्यार्थी एक दिवस अगोदर , तर काही विद्यार्थी नातेवाईकांकडे , काही विद्यार्थी मित्रांकडे , तर काही विद्यार्थी यांनी एसटी स्टँड , लॉज याचा आधार घेतला होता. वेळ , पैसा , मानसिक त्रास सहन करून परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी दक्ष होते. परंतु अचानक परीक्षा रद्द केलेचा मेसेज सर्वत्र पसरला आणि एकच खळबळ उडाली. विद्यार्थी आपआपल्या मित्रांना “खरी की खोटी” बातमी एकमेकांना विचारत होते. विद्यार्थी महाराष्ट्र सरकारच्या एकाएकी घेतलेल्या निर्णयामुळे चकित झाला , संकट कोसळले , घायाळ झाले , विद्यार्थी यांची केवळवाणी अवस्था झाली. नक्की परीक्षा रद्द करण्याचा महाराष्ट्र सरकारचे कारण काय ? विद्यार्थी यांच्या जीवाशी खेळण्याचा महाराष्ट्र सरकारचा ह...

नातेपुते नगरपंचायत झाल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी युवकांची “वळवळ”

संपादक           नातेपुते ता.माळशिरस , जि.सोलापूर या ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाल्याने व काही कालावधीमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे नगरसेवक होण्यासाठी युवकांची वळवळ सध्या चालू झाली आहे. लहान थोरांच्या गाठीभेटी , चहापाणी , बसणे-उठणे , वाढदिवस अशा पद्धतीने चालू झाले आहे. वार्ड रचणेत बदल अपेक्षित आहे. तसेच आरक्षण सोडत महिला , पुरुष तसेच कोणत्या जातीला मिळेल याकडे लक्ष लागून राहिले आहे. नातेपुते येथे युवकांचे गटतट सामाजिक कामे करण्यासाठी पुढे आलेले आहे. प्रत्येकाच्या सुखादुखात सामील होत आहेत. मतभेद विसरून नमस्कार , चमत्कार चालू आहेत. नातेपुते ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रथम नगरसेवक व नगराध्यक्ष होण्याचा मान मिळावा या दृष्ठीने नेते मंडळी युवक वर्ग आत्तापासूनच चर्चेला सुरुवात केलेली आहे. ही निवडणूक चुरशीची होणार का ? एक एक मत नगरसेवक बनण्यासाठी महत्वाचे आहे. तसेच नगराध्यक्ष जनतेतुन निवडला जाईल काय ? असे जनतेतुन बोलले जात आहे. तसेच यामध्ये कोणाकोणाची युती होणार ? आघाडी कोणाची राहणार ? हे ही महत्वाचे ठ...

माहिती अधिकाराचा उपयोग “ब्लॅकमेल” करण्यासाठी न करता “सत्य” शोधण्यासाठी उपयोगात आणणे गरजेचे

संपादक           २००२ मधील महाराष्ट्रात माहिती अधिकार कायदा आला तर १२ ओक्टोंबर २००५ ला केंद्राने माहिती अधिकार आणला. माहिती अधिकाराचा उपयोग जास्त प्रमाणात “ब्लॅकमेल” करण्यासाठी होतोय असे वाटते. माहिती अधिकारातून सार्वजनिक अथवा स्वत:च्या उपयोगासाठी माहिती मागितली पाहिजे ती “जनहितार्थसाठी” उपयोगात आणली पाहिजे. त्या माहितीतून सत्य दडले आहे ते बाहेर काढण्यासाठी या अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. माहिती अधिकारातून माहिती विचारने काही गैर नाही. एक सामाजिक जबाबदारी समजून त्या माहितीतून पारदर्शीपणा आहे की नाही , भ्रष्टाचार झाला की नाही , उत्कृष्ठ कामे झाले की नाही , शासकीय निधिचा योग्य उपयोग केला गेला की नाही या पद्धतीने सत्य बाहेर काढण्यासाठी माहिती अधिकाराचा उपयोग केला पाहिजे. अर्जदारांनी दिलेल्या अर्जाचे निवारण अधिकारी यांनी केले की नाही इ. माहिती राज्यजन माहिती अधिकारी , शासकीय माहिती अधिकारी हे खरी माहिती देतात की नाही किंवा भ्रष्टाचाराला पाठीशी घालतात हे तपासून पाहण्यासाठी माहिती अधिकार वापरला पाहिजे जेणेकरून त्या अधिकार्‍याची अयोग्य अशी भ...

व्यवसायधारक बांधवांसाठी आवाहन करतो की, साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र “ना नफा ना तोटा” या आधारे तुमच्या व्यवसायाची माहिती ग्रामीण, शहर, घराघरात, शासकीय, निमशासकीय इ. जनतेपर्यंत व्यवसायाची माहिती प्रसिद्धी करण्यासाठी साप्ताहिक बहुजन भूषण या वृत्तपत्राची मदत घ्या

संपादक           गेली दोन वर्षे कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या आपत्तीमुळे व्यवसाय धारकाचे प्रचंड नुकसान झाले असून कोरोना या रोगाची आपत्ती गेली नाही. त्यामध्ये शासनाचे आदेश , संचारबंदी , यामुळे व्यवसायकावरती संकट आले त्यामुळे पुन्हा उभारी घेवून आपल्या व्यवसायाची माहिती ग्रामीण , शहर , घरोघरी , शासकीय , निमशासकीय कार्यालयातील जनतेपर्यंत माहिती व्हावी या दृष्ठीने आम्ही “ना नफा ना तोटा” यावरती आधारित राहून आपल्या व्यवसायाची माहिती आमच्या साप्ताहिक बहुजन भूषण व बहुजन मित्र या वृत्तपत्रातून जाहिरातीच्या माध्यमातून देवून सहकार्य करा. आपल्या व्यवसायाची माहिती जनतेपर्यंत पोहोचेल याची आम्ही हमी घेत आहोत. तुमचा व्यवसाय कोणत्याही गल्लीत , कोणत्याही मजल्यावरती , कोठेही असुदया त्याची ओळख करून देण्यासाठी आमचे वृत्तपत्र तुमच्या व्यावसायाचे आधार बनेल , तुमची प्रगती हाच आमचा आनंद , तुम्ही देत असलेली जाहिरात इंचा मध्ये नसून जेवढी रेखीव , कोरीव , आकर्षक करता येईल तेवढी संपादक या नात्याने सर्वस्वी जबाबदारी आमची आहे. त्यासाठी आम्ही कटिबद्ध राहणार आह...

नातेपुते गावामध्ये डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी मा.श्री.मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराचा आदर्श सामाजिक उपक्रम

  मा. श्री.मालोजीराजे देशमुख संपादक दिनांक ०५/०९/२०२१ रोजी नातेपुते ता. माळशिरस या गावामध्ये कोरोनाचा कहर चालू असतानाच डेंगू व चिकनगुनीया या साथीच्या रोगाने गावामध्ये थैमान घातले आहे अशा परिस्थितीत मा.श्री.मालोजीराजे देशमुख मित्र परिवाराच्या वतीने नातेपुते गावात गल्लो-गल्ली जाऊन डेंगू व चिकनगुनिया प्रतिबंधात्मक औषधाची फवारणी करण्यात आली. याचे उद्घाटन माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम. पी. मोरे साहेब यांच्या हस्ते मार्केट कमिटी नातेपुते येथून या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या गावामध्ये डेंगू व चिकनगुनियाची साथ सुरू असून या आजाराने अनेक व्यक्ति बाधित झाल्या आहेत त्यामुळे हा आजार कोणत्याही व्यक्तिला होऊ नये यासाठी औषधाची फवारणी केली गेली व गावामधील घरोघरी जाऊन डेंगू व चिकनगुनिया होण्याची कारणे व त्यासाठी घ्यावी लागणारी खबरदारी व उपाययोजना याबाबत माहिती पत्रक वाटप करण्यात आले. तसेच प्रबोधन व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी जि . प. सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख , कृषि उ. बा.स. उपसभापती मामासाहेब पांढरे , पंचायत समिति सदस्य माऊली पाटील , नातेपुते ग्रा.प.चे उपसरपंच अतुल (बापू) प...

नातेपुते पालखी मैदान येथे चोरट्यांचा धुमाकूळ जनतेमध्ये चिंतेचे वातावरण पोलिस स्टेशन ने रात्रीत दोन वेळा या भागात पेट्रोलिंग करणे गरजेचे

  ज्ञानेश्वर चंद्रकांत गुळिग सर यांच्या गाडीचे केलेले नुकसान  संपादक           नातेपुते पालखी मैदान ता.माळशिरस येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चप्पलचे व्यापारी खंदारे यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून दोन चप्पलचे जोडे व एक चप्पल तयार करण्याचे हत्यार चोरटे घेऊन गेले तसेच चोरट्यांनी त्यांचे बूट खंदारे यांच्या घरात सोडून नवीन चप्पलचे जोड घेऊन गेले. तसेच ज्ञानेश्वर चंद्रकांत गुळिग सर यांची चारचाकी गाडी Nexon MH 42 AX 4394 या गाडीच्या काचा फोडून नुकसान केले आहे. तसेच प्रकाश साळवे , ग्रामपंचायत सदस्य यांच्या घराचे कडी कोयंडा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या जागरुतीमुळे त्या घरातील चोरट्यांनी मोबाईल चार्जर घेऊन गेले आहेत. तसेच नातेपुते येथे काही ठिकाणी चोरांनी चोरी केल्याचे बोलले जात आहे. चोरट्यांनी पालखी तळाशेजारील कुटुंबांना “टार्गेट” केल्याचे चित्र दिसत आहे. हे भुरटे चोर असावेत असे जनतेतून बोलले जात आहे. या भागात नातेपुते पोलिस स्टेशनने पेट्रोलिंग करावे असे जनतेला वाटते. या भागात चोरट्यांचा धुमाकूळ चालू असून यामुळे ...