संपादक कोल्हाटी समाजामध्ये नोकरीचे प्रमाण अत्यल्प असे आहे . या समाजातील कुटुंबामध्ये मुलगी जन्माला येते त्यावेळी त्या कुटुंबाला लक्ष्मी घरात आल्याचा आनंद होतो तर कुटुंबात मुलगा जन्माला आला तर म्हणावा तसा आनंद होत नाही याचे कारण म्हणजे या समाजात असलेल्या रूढी परंपरा. कोल्हाटी समाजातील बांधव आणि महिला उदरनिर्वाहासाठी कलेचा आश्रय घेतात हे आनंददायी आहे परंतु समाजातील ज्या आजपर्यंत आलेल्या रूढी परंपरा आहेत त्या परंपरेत सुधारणा केली पाहिजे म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये समान हक्काची न्याय प्रणाली असायला हवी. उदा. ज्यावेळी मुलगा मुलगी यांच्या लग्नाची पाहणी ते लग्न असा जो कार्यक्रम असतो तो एकतर्फी असतो. मुलाला मुलगी पाहण्यासापासून ते लग्न पार पडे पर्यंत मुलाच्या आई वडिलांनी मुलीच्या आई वडिलांना वरदक्षिणा द्यावा लागतो त्यामुळे गरीब असो व श्रीमंत त्या मुलाच्या आई वडिलांना ५० , ०००/- (पन्नास हजार रुपये) ते ५ , ०००००/- (पाच लाख रुपये) व त्यापुढेही खर्च होऊ शकतो. मुलीच्या आई वडिलांना खर्च नसतो. सारा खर्च मुलाच्या आई वडिलांनी करायचा असतो ही कोल्हाटी समाजमधील परंपरा आ...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे