Skip to main content

Posts

Showing posts from May, 2021

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

मा.श्री. आमदार निलेश लंके साहेब “दयावान” लोकनेता

  मा.श्री. आमदार निलेश लंके साहेब (आमदार पारनेर-नगर विधानसभा) संपादक       पारनेर चे लोकप्रिय राष्ट्रवादी पक्षाचे आमदार कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या संकटावेळी खासदार शरद पवार यांच्या नावाने कोव्हिड सेंटर उभे करून गोरगरीब जनतेला आधार देणारे असे आमदार निलेश लंके साहेब दिनदुबळ्या जनतेसाठी  “दयावान”  ठरले आहेत. साधी राहणी ,  उच्च विचारसरणी ,  जनतेच्या हाकेला धावून जाणारे त्यांच्यावर कोसळलेले संकट त्या संकटापासून बाहेर काढणारे आदर्श व्यक्तिमत्व ठरले आहेत त्यांच्या या सेवाभावी कामगिरीमुळे ते  “दयावान”  ठरत आहेत. आजपर्यंत असंख्य आमदार झाले परंतु असा आमदार ना मागे कधी बघितला नाही आणि पुढे असे    होतील असे वाटत नाही. कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती म्हणजे मृत्युचे संकट समजले जात आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारत देशातील जनता त्या या कामगिरीवर आनंदी आहे. या आमदारासारखे कोणतेही आमदार खासदाराचे काम नाही.  “मानवतेचा झरा म्हणजे आमदार निलेश लंके साहेब"  आहेत. त्यांच्यापुढे माणुसकी ही जातच माणसाला आधार देते हे दाखवण्या...

कोरोना कोव्हिड-१९ या आपत्तीच्या रोगावर जे सरकार जनतेला इंजेकशन देते त्या इंजेकशनाचे फायदे, त्याची ध्येय उद्दिष्टे जनतेला माहिती असायला हवे यासाठी जनजागृती करणे हिताचे आहे

संपादक                                                कोरोना कोव्हिड-१९ या रोगाची आपत्ती जनतेला वेदना देण्यासाठी तसेच जगाचा निरोप घेण्यासाठी मारक ठरत आहे. या रोगावरती सरकार जनतेला वाचवण्यासाठी विविध कंपनीचे इंजेकशन देण्याचा जो सपाटा लावलेला आहे तो चांगला व आनंदाची बाब आहे. परंतु या इंजेकशनाचे फायदे काय आहेत हे इंजेकशन माणसाच्या शरीरात असलेल्या किती रोगावर प्रभावित आहे जेणेकरून त्या माणसाच्या शरीरातील रोग आहेत ते नष्ट होतील. तसेच या इंजेकशनचा परिणाम होईल का ? यासाठी माणसाच्या शरीरात असलेले असंख्य रोग त्या रोगावर सध्या दिले जाणारे इंजेकशन काय परिणाम करेल का ? शरीरातील कोणकोणत्या आजारावर हे इंजेकशन उपयोगी पडू शकते त्या आजारांची नावे कंपनी व सरकारने देणे मला संपादक म्हणून योग्य वाटते. केवळ कोरोना कोव्हिड-१९ ही आपत्ती समजून ह्या इंजेकशन चे फायदे तोटे न बघता जनतेला माहिती न देता जनतेला देणे हे योग्य नाही असे माझे ठाम मत आहे. एकतर या देशातील जनता “माकड” झाली आहे. राज्यकर्...

माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदारांना “ब्लॅकमेल” करून पैसे उकळण्याचा समाजकंटकांचा धंदा तेजीत

संपादक   कोरोना कोव्हिड-१९ या रोगाच्या काळात शासनाने जनतेच्या हितासाठी धान्य वाटप करून जनता जगवण्याचा प्रयत्न करीत असताना त्या रेशन दुकानदारांना मोजक्या तोतया समाजकंटकाकडून रेशन दुकानदारांना “टार्गेट” करून पैसे उकळण्याचा काही समाजकंटकाचा धंदा आहे. समाजकंटक रेशन दुकानदारांना मानसिक त्रास देवून पैसे काढतात. वरिष्ठ अधिकारी कार्यालयाकडे पैसे काढण्याच्या हेतूने काहीतरी पत्र व्यवहार करून त्या पत्राच्या आधारे रेशन दुकानदारांना भीती दाखवून पैसे व रेशनचा धान्यपुरवठा हे       समाजकंटक घेऊन जात आहेत. रेशन दुकानातील कागदपत्रे तपासायला आलो आहे व वरिष्ठ कार्यालयाने माझी नेमणूक केली आहे असे म्हणून प्रचंड नाहक त्रास समाजकंटक “ब्लॅकमेल” करून पैसे व धान्य पुरवठा घेऊन जात आहेत. माळशिरस तालुक्यातील रेशन दुकानदार हैराण झाले आहेत. ब्लॅकमेल करणारा आहे तो दहा हजार ते वीस हजार अशी मागणी प्रत्येक रेशन दुकानदारांना करीत आहेत. तसेच काही व्यक्तींनी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून संस्था काढून त्या संस्थेच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून पैसे उकळण्याचा धंदा चालू केला आहे. रेशन दुकानदारांनी जो कोण...

कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात पत्रकाराची "माझी पत्रकारिता माझी जबाबदारी" हे योगदान अत्यंत महत्वाचे

संपादक   गेल्या वर्षभरापासून कोरोना कोव्हिड - १९ या रोगाने हाहाकार उडवलेला आहे , जगणे अवघड झाले आहे , फिरणे अवघड झाले आहे अशा या महाभयंकर संकटातून समाजप्रबोधनासाठी समाजबांधवांना घडणाऱ्या घटनांची माहिती पुरवण्यासाठी पत्रकार जीवाची पर्वा न करता बातम्यांसाठी धडपडीत असतात . या रोगाचे संकट स्वतःवर व कुटुंबावर आघात करू शकते पण त्याची भीती न बाळगता धोका पत्करून आमचे पत्रकार बांधव मोठ्या हिमतीने बातमीतून प्रसार व जागरूकता यासाठी अहोरात्र झटतात मग तो पत्रकार चॅनेलचा , दैनिकाचा , साप्ताहिक , मासिक , पाक्षिक इ . कोणत्याही मीडियाचा असुद्या त्यांची तळमळ ही जनतेला सावधगिरी बाळगण्यासाठी व सावधान होण्यासाठी पत्रकार आपली भूमिका पार पाडीत आहेत . पत्रकार हे जनतेचे खरे मित्र आहेत . कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी दिवसरात्र आपले कर्तव्य पार पाडीत आहेत . पत्रकारांना बातमीसाठी जात असताना पोलिसांकडून मानहानी व अपमान सहन करावा लागतो हे चिंताजनक बाब आहे . मला बातमीसाठी जात असताना आलेला अन...

श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

  संपादक  कोरोना कोव्हिड-१९ आपत्ती काळात शासनाने सांगितलेल्या नियमानुसार नातेपुते येथील श्री गणेश प्रतिष्ठान यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कोरोना कोव्हिड-१९ या आपत्ती काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्री गणेश प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...! बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आठवले परिवार

अनुसूचित जातीसाठी १३% आरक्षण आहे ते यापुढे २६% आरक्षण लोकसंख्येच्या आधारे असावे

संपादक             भारतरत्न प . पु . डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळच्या कालखंडाच्या लोकसंख्येच्या आधारानुसार अनुसूचित जातीमध्ये मोडणाऱ्या ज्या ५९ जाती आहेत त्या जातीसाठी त्यावेळी १३ % आरक्षण केले गेले आता त्यामध्ये लोकसंख्येत भरमसाठ वाढ झाली आहे त्यावाढीनुसार दुप्पट आरक्षण हे अनुसूचित जातीसाठी असायला हवे . काळानुसार लोकसंख्येचे प्रमाण वाढत आहेत त्यानुसार आरक्षणाच्या टक्केवारी मध्ये बदल असायला हवा . अनुसूचित जातीमध्ये एकूण ५९ जाती समाविष्ट केल्या आहेत त्यामधील प्रत्येक जातीची वाढलेली लोकसंख्या पाहता त्या प्रत्येक जातीचा सदस्य आमदार , खासदार बनला जाईल एवढी लोकसंख्येत वाढ झाली आहे . मी संघटनेचा संस्थापक व वृत्तपत्राचा संपादक पत्रकार म्हणून काम करीत असताना माझ्याही मनामध्ये अनुसूचित जातीमधील एकूण जाती व लोकसंख्या पाहता २६ % आरक्षण व्हावे असेही माझे मत आहे . आम्ही सर्व अनुसूचीतील ५९ जातींनी तसेच देशव्यापी मोर्चे , आंदोलने उभी केली तर तसे आरक्...