Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या नकाशामुळे शेतीधारक व प्लॉट धारकांची दीपावली सणात उडवली झोप : मा.अभिमन्यू आठवले

संपादक : अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)  नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या व संपादक यांच्या हाती लागलेल्या नकाशानुसार, दसरा सण झाला, दीपावली सण सुरु होत आहे हे जनतेसाठी आनंदाचे सण आहेत परंतु नातेपुते नगरपंचायतने शेती धारक व प्लॉट धारक यांना माहिती न देता नकाशा प्रसिद्धी करून झोप उडवली आहे. शेती धारक व प्लॉट धारक यांचे प्रचंड नुकसान होणार आहे, बेघर होणार आहेत, शेती धारक व प्लॉट धारक आपले कसे होणार? यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केले आता यापुढे शेती धारक व प्लॉट धारक यांना उध्वस्त करून नगरपरिषद करायची आहे काय? नगरपरिषद करायची असल्यास नातेपुते नगरपंचायतला लागून असलेली गावे मोरोची, कारुंडे, व इतर गावे घेणार का?, असे संपादक व संघटनेचा संस्थापक म्हणून वाटते. शेती धारक व प्लॉट धारक यांनी त्वरित गट नंबरचे ७/१२ उतारे, तसेच असिसमेंट उतारे काढून त्यावरती बाधित क्षेत्र असा उल्लेख आहे का? यासाठी उतारे काढून बघावेत व आपले म्हणणे नातेपुते नगरपंचायतकडे लेखी द्यावे. शेती धारक व प्लॉट धारक यांना देशोधडीला लावून रस्ते करणे, बगीचे करणे...

नातेपुते नगरपंचायतकडून प्रसिद्ध झालेल्या प्रारूप विकास आराखडा नकाशामुळे वार्ड क्रमांक ३ व इतर दिलेल्या नातेपुते गटातील रहिवाशी चिंतातूर: अभिमन्यू आठवले

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र           नातेपुते , ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील नातेपुते नगरपंचायतने नुकताच प्रसिद्ध   केलेल्या प्रारूप विकास आराखडा नकाशातील गट नंबर मधील रस्ता रुंदीकरण बाबत नकाशा संपादक अभिमन्यू आठवले यांच्या हाती लागला असून नकाशा कोणाच्या सांगण्यावरून केला गेला ?  रस्त्याची रुंदी किती वाढवणार ?  नकाशा तयार करण्या अगोदर ज्या गट नंबर मधील रहिवासी यांना का विश्वासात घेतले नाही , बोलावले का नाही ? हा नकाशा ग्रामपंचायत काळातील आहे का? की सध्या नगरपंचायत काळातील आहे? हा ठराव करून वरील कार्यालयाकडे गट नंबर पाठविले होते का?  ज्या जागा मालकांनी आप-आपल्या परीने गटार व पाण्याच्या पाईप लाईनसाठी जागा सोडून घरे बांधली आहेत , पूर्वीपासून रस्ते आहेत त्याची रुंदी वाढविण्याचे कारण काय ?  जेवढा आहे त्यानुसारच त्याचे उत्कृष्ट काम केले पाहिजे.             पै-पै जमा करून ,  कर्ज काढून घरे बांधली गेली आहेत , ती पडणार का ?  त्याचा मोबदला किती देणार ?...

महायुतीच्या माळशिरस विधानसभा समन्वयक पदी मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांची निवड

उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  महायुतीकडून महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक मतदार संघात समन्वयक पदी शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारसाहेब, यांच्याकडून समन्वयकच्या निवडीची यादी नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथील मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांची माळशिरस तालुका समन्वयक पदी निवड केली गेली.  मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांनी शिवसेना शिंदे गट यांचे "गाव तेथे शाखा" काढून शिवसेना वाढवली. शिंदे गटाच्या शिवसेनेला उभारी देण्याचे काम हिवरकर-पाटील यांनी केले आहे. जेवढे महाराष्ट्र राज्यात शिंदे गट शिवसेना यांचे काम नाही तेवढे काम शिवसेना शिंदे गट पक्षाचे माळशिरस तालुक्यात राजकुमार हिवरकर-पाटील यांच्यामुळे आहे.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेना नेते हिवरकर-पाटील यांचे माळशिरस तालूक्यात प्रचंड काम आहे त्याची दखल घेऊन शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी माळशिरस विधानसभा मतदार संघाच्या समन्वयक पदी मा.राजक...

नारीशक्तीमुळे माळशिरस तालुक्याला मिळाले ९२ कोटी रुपये - राजकुमार हिवरकर पाटील

उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) माळशिरस तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, तसेच अंगणवाडीच्या पर्यवेक्षिका यांचा भव्यदिव्य असा मान-सन्मान शिवसेना नेते राजकुमार हिवरकर-पाटील यांच्याकडून माळशिरस पंचायत समिती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या सभागृहात करण्यात आला.      यावेळी माळशिरस पंचायत समितीच्या महिला बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती आसमा आतार मॅडम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रामधून माळशिरस तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधीने आमचा सन्मान करणे हा बहुतेक पहिलाच कार्यक्रम असावा, त्यांनी त्यांचा मनाचा मोठेपणा दाखवून आमचा मान सन्मान करण्यासाठी ते इथपर्यंत आले आणि आमचा मान सन्मान केला त्याबद्दल नेहमीच आम्ही त्यांचे आभारी असू. तसेच त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधून माळशिरस तालुक्यातील आपला लाडकी बहीण योजनेचा फॉर्म पहिला सबमिट झाला असे गौरवउद्गार  काढले. यावेळी अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी त्यांचे मत व्यक्त करताना सांगितले की, आम्हाला मदतनीस तसेच सेविका हे रात्रीच्या बारा वाजले, रात्रीच्या दोन वाजले आणि पहाटेचे चार वा...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वछता हीच सेवा अभियान संपन्न

      उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)               सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालय नातेपुते, "राष्ट्रीय सेवा योजना" विभागाच्यावतीने युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय भारत सरकार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या निर्देशानुसार दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत राबविला जात असणारा "स्वच्छता हीच सेवा" या मोहिमेअंतर्गत 'स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता' हा उपक्रम अंतर्गत नातेपुते नगरपंचायत पाण्याची टाकी स्वच्छ करण्यात आली, विठ्ठल मंदिर व परिसर स्वच्छता करण्यात आला, तसेच त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना दिन 'स्वच्छ भारत' अभियानाची शपथ घेण्यात आली.       यावेळी प्रा.डॉ.डी.एस.थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महाविद्यालयात करण्यात आले. या अभियानाची सांगता म्हणून आज बुधवार दिनांक ०२/१०/२०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची  जयंती 'आ...