माळशिरस तालुक्यातील रोड रोमिओबाबत तालुक्यातील मुख्याध्यापकांची तात्काळ मीटिंग आयोजित करा: राजकुमार हिवरकर-पाटील
उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र माळशिरस तालुक्यामध्ये शिक्षण संस्थांचे फार मोठ्या प्रमाणात जाळ आहे , परंतु प्रत्येक मोठ्या गावातील शाळा किंवा त्या ठिकाणाहून वावरत असताना मोठ्या शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना खेड्यातून शहरांमध्ये येणाऱ्या मुलींना रोड रोमिओचा त्रास , शाळेच्या बाहेर एसटी बस स्थानकावर एसटी स्टँड ते शाळा त्याचबरोबर शाळा सुटल्यानंतर घरापर्यंत पोहोचेपर्यंत काही रोडरोमिओ मोटरसायकल वरून कर्ण कर्कश आवाज करीत मुलींच्या मागेपुढे फिरताना दिसतात. याबाबत राजकुमार हिवरकर-पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी व तात्कालीन डी.वाय.एस.पी मॅडम यांच्यासह माळशिरस तालुक्यातील चारीही पोलीस स्टेशनचे प्रमुख अधिकारी , निर्भया पथक यांच्यासह बैठकीच आयोजन करावे असे सांगितले. नवदुर्गेच्या नवरात्राच्या महोत्सवादरम्यान आयोजन केले व नारीशक्ती सशक्त होण्यासाठी जिजाऊ सावित्री लेकीसाठी प्रशासन सक्षम आहे असे सांगितले. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या गोष्टीला पाठीशी घातल जाणार नाही याची खबरदारी म्हणून बैठकीच आयोजन राजकुमार ह...