Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते पोलीस ठाणे येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अनुषंगाने नातेपुते शहरात रॅलीचे आयोजन

    

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार

नातेपुते पोलीस ठाणे कर्मचारी, पोलीस पाटील व एस.एन.डी.इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे आरएसपीचे विद्यार्थी यांनी नातेपुते शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रॅली काढण्यात आली. त्यावेळी स.पो.नि. परिस्थिती यांनी सर्व नातेपुतेकरांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम समजून घेत स्वतःमध्ये शिस्त लावून घेतली पाहिजे. नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक नियमांचे पालन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी. 

अपघात झाल्यास नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करावी. जे अपघातग्रस्त यांना तात्काळ मदत करतात, त्यामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचते, अशा दानशूर व्यक्तीस मृत्युंजय या पदवीने सन्मानित केले जाते. कुठल्याही चौकशीला बोलवले जात नाही, सर्व प्रवास अपघात विरहित राहतील यांची दक्षता सर्व यंत्रणेने घ्यावी. प्रत्येकाने सतर्क, जागरूक राहत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे असे मत नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी नागरिकांना व वाहनचालकांना केले. 

नातेपुते पोलीस ठाण्याचे कर्मचारी तसेच नातेपुते येथील एस. एन. डी. सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नातेपुते पोलीस ठाणे येथून नातेपुते शहरातील मेन मेन चौकामध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रॅली काढून नियम पाळा, अपघात टाळा, वेगावर नियंत्रण, जीवन सुरक्षित अशा घोषणा देत अपघात होऊ नये यासाठी जनजागृती केली. 

यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे, मनोज राऊत, गोपनीय विभागाचे अमोल देशमुख, वाहतूक सुरक्षा यंत्रणेचे रमेश बोराटे, राकेश राव, वर्षा गुळीग, पोलीस पाटील औदुंबर बुधावले तसेच नातेपुते परिसरातील सर्व पोलीस पाटील व एस. एन. डी. सीबीएससी स्कूलचे विद्यार्थी रस्ता सुरक्षा सप्ताह मध्ये सहभागी झाले होते.

रस्ते अपघाताचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाहनांचा अतिवेग त्यामुळे वाहनांचा अतिवेग कमी केल्यास अनेक अपघात टळू शकतात, दुसरे कारण ओव्हरटेक करण्याची स्पर्धा यामध्ये स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात टाकू नका, वाहनाने प्रवास करणारे असो किंवा पादचारी असो रस्ता एकेरी असो किंवा दुहेरी रस्त्याच्या डाव्याबाजूने प्रवास करणे सक्तीचे असते, वाहन वळवताना इंडिकेटर करा त्यानंतर दिशा बदला, दारू पिऊन गाडी चालवणे अपघाताला आमंत्रण आहे. त्यामुळे कोणतेही परिस्थितीत दारू पिऊन गाडी चालवू नये, गाडी चालवत असताना फोनचा वापर कमी करा वाहन रोडच्या साईटला घेऊन मोबाईलवर बोला, वाहनामध्ये सुरक्षित अंतर ठेवा समोरील वाहनाने ब्रेक मारल्यास अपघात होणार नाही, गरज असल्यास गाडीचा हॉर्न वाजवा विनाकारण गर्दीच्या ठिकाणी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण करू नका, जर हे वाहतुकीचे नियम वाहनधारकाने पाळले पालन केले तर आपल्याला सुरक्षित प्रवास अनुभवता येईल.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...