उपसंपादक : वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते पोलीस ठाणे कडून शाही मज्जिद नातेपुते या ठिकाणी दिनांक 27/03/2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान सणानिमित्त नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते शहर व परिसरातील 150 ते 200 मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पोकॉ, मदने बोराटे, आवळे, देशमुख व होमगार्ड गावडे, बंडलकर, काळे, रुपनवर, माने, मारकड उपस्थित होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी देखील उपस्थित होते. सदर वेळी मुस्लिम धर्मियांना रमजान ईद व गुढीपाडवा तसेच इतर सणानिमित्त हद्दीत कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. असे नातेपु...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे