Skip to main content

Posts

Showing posts from September, 2024

अकलूज बस डेपोचा कायापालट करणार :भरत शेठ गोगावले

               उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)                    अकलूज बस डेपोसाठी नवनिर्वाचित एसटी महामंडळाचे अध्यक्ष मा. श्री. भरत शेठ गोगावले यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त यांच्याकडून आळंदीच्या बैठकीत सत्कार करून निवेदन दिले.           निवेदनात म्हटले आहे की, अकलूज बस डेपोला पूर्वी जवळपास 110 बस उपलब्ध होत्या. पूर्ण तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक, माता-भगिनी, विद्यार्थी हे लालपरीतून प्रवास करीत असे. बस जास्त जुन्या होत गेल्या तशा त्या स्क्रॅप झाल्या, नव्या बस उपलब्ध न झाल्याने महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी महिलांसाठी अर्ध  तिकीट योजना लागू केली परंतु लालपरीची संख्या कमी असल्याने तीर्थक्षेत्राकडे जाणाऱ्या लालपरीची संख्या कमी आहे. त्यामुळे माता-भगिनींना याचा लाभ घेता येत नाही. त्याची संख्या ६० वर आली. अकलूज बस डेपोसाठी जवळपास ४५ कर्मचारी अत्यावश्यक आहेत. त्यामध्ये लिपिक, चा...

वडिलांनी केलेल्या कष्टाचे फळ मिळाले - हिवरकर पाटील

   उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)   अ त्यंत हलाखीची परिस्थिती असून सुद्धा माझ्या मुलाला मी पोलीस बनवणारच ह्या स्वप्नाला उराशी बाळगून मूळचे सदाशिवनगर  येथील पिंटू ओवाळ सध्या राहणार पिंपरी चिंचवड आणि पिंपरी चिंचवड येथील भाजी मंडई मध्ये हमाली करणाऱ्या एका बापाचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचा अनिकेत नावाचा मुलगा अवघ्या 20 व्या वर्षी सोलापूर एस आर पी एफ मध्ये पोलीस पदावर विराजमान झाला. अनिकेत ओवाळ हे सध्या पदवीच्या दुसऱ्या वर्षामध्ये शिकत आहेत बारावी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी खूप कष्टाने आणि जिद्दीने अभ्यास करून पोलीस व्हायचं आणि वडिलांचे स्वप्न आहे की मुलाला वर्दी ही मिळालीच पाहिजे हे स्वप्न उराशी बाळगून रात्रंदिवस अभ्यास करून अवघ्या दोनच वर्षात सोलापूर येथे झालेल्या एस आर पी एफ या पदासाठी गवसणी घातली आहे. त्यांचं अभिनंदन करताना  राजकुमार हिवरकर पाटील शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी  म्हणाले की खूप कमी वयात मोठी जबाबदारी तुमच्यासारख्या वीर जवानांच्या हाती आली म्हणजे आपला भारत देश पूर्ण तरुणांच्या हाती ...

नातेपुते नगरपंचायतच्या उपनगराध्यक्षपदी मा.अतुल(बापु) पाटील विराजमान

उपसंपादक:  वैभव आठवले  (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)   नातेपुते नगरपंचायतचे बांधकाम सभापती मा.अतुल(बापु) पाटील यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बार्शीचे मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण यांनी कामकाज पाहिले.  नातेपुते ही पहिली ग्रामपंचायत होती, त्याचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. पहिला नगराध्यक्षा होण्याचा मान उत्कर्षांराणी पलंगे यांना मिळाला, त्यांनी राजीनामा दिल्यानंतर नातेपुते नगराध्यक्षा म्हणून अनिता लांडगे या विराजमान झाल्या. उपनगराध्यक्षपदी मालोजीराजे देशमुख यांनी अडीच वर्ष कामकाज चालवले. मालोजीराजे देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक जाहीर झाली. उपनगरध्यक्षपदासाठी अतुल(बापु) पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. सर्व नगरसेवक यांनी एकमताने बिनविरोध निवड केली. निवड होताच फटाके फोडून आनंद व्यक्त केला.  यावेळी उपसभापती मामासाहेब पांढरे, पंचायत समिती सदस्य माऊली पाटील, नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष अनिता लांडगे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षांराणी पलंगे, माजी उप...

जिजाऊ सावित्रीच्या लेकीसाठी जनजागृती चळवळ राबवण गरजेच : राजकुमार हिवरकर-पाटील

उपसंपादक वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      राज्याचे शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांना शिवसेनेचे नेते तथा नातेपुते एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त राजकुमार हिवरकर-पाटील यांनी निर्भया पथक, पोस्को कायदा, जाणीव जागृती प्रतिबंधात्मक योजना, व्यसनमुक्ती अमली पदार्थचे दुष्परिणाम, रस्ता सुरक्षितता व वाहतुकीचे नियम याबाबतचे मागणी पत्र रामटेक या त्यांच्या शासकीय निवासस्थानी बैठकीत दिले. सोलापूर जिल्ह्यात तसेच माळशिरस तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक व ज्युनिअर कॉलेज यामध्ये सर्व मुख्याध्यापकांची वरील विषयांसाठी बैठक आयोजित करणे गरजेचे आहे याबाबतचे निवेदन मी शिवसेनेच्या वतीने सन्माननीय मुख्यमंत्री सन्माननीय स्वतः आपण व आरोग्यमंत्री सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुख ग्रामीण डीवायएस, जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, तालुक्याचे शिक्षणाधिकारी यांना ५/४/२०२४ रोजी दिलेली आहे.       बदलापूरच्या घटनेची पुनरावृत्ती टाळायची असेल तर जिल्हा, तालुक्यासह प्रत्येक शाळेवर समित्या स्थापन करणे गरजेचे आहे. मुलींना गुड टच बॅड टच या...