उपसंपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीवरून दिनांक १७/०५/२०२४ रोजी नातेपुते येथील बिअर बार परमिट रूम येथे आरोपी नामे अक्षय बोडरे, राहणार फोंडशिरस व त्याचा दाजी दोघांनी नारायण विठ्ठल जाधव राहणार चिकणे वस्ती, दहिगाव, तालुका माळशिरस यास किरकोळ गोष्टीवरून शिवीगाळ करून मारहाण केल्याने त्याचा जाब विचारण्यास फिर्यादी व १)नारायण विठ्ठल जाधव २) दुर्योधन नवनाथ निकम ३)बाळू कुंडलिक जाधव ४)विनोद पोपट गोरे सर्व राहणार चिकणे वस्ती, दहिगाव तालुका माळशिरस असे सायंकाळी नातेपुते ते फोंडशिरस जाणाऱ्या रोडवरील बनात असलेल्या महादेव मंदिराजवळ गेले असता तेथे आरोपी नामे अक्षय बोडरे व त्याचा दाजी व इतर अनोळखी मुले यांना अक्षय बोडरे याने बोलावून घेऊन आम्ही सर्वांनी त्याला मारहाण केली आहे असे खोटे सांगितले नंतर त्या सर्वांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना शिवीगाळी धमकी दमदाटी करून विटा मारून जखमी केले व अनोळखी मुलांपैकी एका मुलाने अक्षय बोडरे यास चाकू सारखे धारदार हत्यार दिल्यानंतर त्या हत्याराने अक्षय बोडरे यांनी 1) नारायण विठ्ठल जाधव यांना...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे