महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातून प्रत्येक गावात "संविधान भवन" बांधण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत तरी बौद्ध समाजातील बांधवांनी यासाठी झटावे
उपसंपादक बहुजन भूषण वृत्तपत्र गावातील प्रत्येक व्यक्तीने ग्रामपंचायतमध्ये याबाबत चौकशी करावी. संविधान भवन कोठे बांधायचे? व ते कशा पद्धतीने बांधायचे आहे? याबाबत ग्रामपंचायतमध्ये ठराव देवून पंचायत समितिकडे नेऊन द्यायचा आहे. प्रत्येक गावात संविधान भवन हे सामाजिक न्याय विभागाकडून बांधण्यात येणार आहे. समाजबांधवांना कोणताही एक रुपया खर्च करण्याची गरज नाही, सर्व प्रक्रिया शासनाची आहे ती ग्रामपंचायतकडून घेण्यात येणार आहे. संविधान भवन प्रत्येक गावात बांधणे बंधनकारक आहे. याला कोणाचा विरोध असला तरी ते काहीच करू शकत नाहीत. ही प्रक्रिया ग्रामपंचायतमार्फत, पंचायत समिति मार्फत, जिल्हा परिषद मार्फत नंतर सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाकडे जाणार आहे. यामध्ये कोणाची मध्यस्थी राहणार नाही, कोणीही दलाली करू शकनार नाही. त्यासाठी महत्वपूर्ण अटी पुढीलप्रमाणे. १) ग्रामपंचायत मासिक सभेत ठराव घेणे. २) मासिक सभा ठराव विषय - सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामपंचायतमध्ये संविधान भवन बांधून मिळणेबाबत असा विषय राहील. ३) तसेच संविधान भवन...