संपादक
रेशन दुकानातील गोर गरीब जनतेला मिळत असलेले धान्य त्यावरती सरकारने हमीपत्र घेण्याचे काम चालू केले आहे. रेशन कार्ड धारकांना शासनाकडून जे धान्य व इतर साहित्य मिळत होते. ते आता यापुढे बंद होईल असे चित्र दिसत आहे. शासनाने रेशन कार्ड धारकाकडून हमीपत्र घेण्याचे काम चालू केले त्या हमी पत्रात कार्ड धारक प्रामाणिकपणे माहिती देत आहेत. आज पर्यंत जसे रेशन दुकानाकडून जसा धान्यपुरवठा केला जात होता तसाच पुढेही चालू राहिला पाहिजे जेणेकरून निदान गोरगरीब त्या धान्यावरती जगू शकेल. जो गॅस धारक लाभार्थी आहे तो शासनाने ठरवलेल्या दरानुसार गॅस टाकी भरत असेल म्हणून तो श्रीमंत अथवा मध्यमवर्गीय होत नाही किंवा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे होत नाही. शासनाने रेशन कार्ड धारकाकडून नियम व अटीचे हमीपत्र भरून घेत आहे ते चुकीचे आहे. हा देशातील गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्यासारखा आहे. सध्याच्या काळात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आहे. जनतेपुढे कसे जगायचे हा प्रश्न उभा आहे. त्यामध्ये रेशन दुकानातील धान्यपुरवठा गोरगरिबांना मिळणार होता तोही या जाचक अटीमुळे रेशन कार्ड धारकांना मिळणार नाही हे चित्र दिसत आहे. लाभार्थी यांच्याकडे कार्ड कोणतेही असुद्या त्या लाभार्थी यांना रेशन दुकानातील धान्य व इतर वस्तू मिळाल्या पाहिजेत. रेशन कार्ड धारकाकडून हमीपत्र घेणे हे "हुकूमशाही" चे लक्षणे आहेत. सध्या शेतकरी उध्वस्त होत चालला आहे, कंपन्या बंद पडल्या आहेत, तरुणांच्या हाताला काम नाही, शिकून मुले घरी बसले आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही असे अनेक गंभीर प्रश्न उभे असताना सरकारने रेशन कार्ड धारकावरती संकट आणले आहे. रेशन कार्ड धारकांना उध्वस्त करून सरकारला गोर गरीबाची दयनीय अवस्था बगत बसायचे आहे काय? जे रेशन कार्ड धारक आहेत ते जे सरकारने ठरविलेल्या अटी व नियमामुळे हमीपत्र भरून देतील ते श्रीमंत आहेत गरीब नाही हे बघण्यासाठी कारण ठरत आहे त्यामुळे रेशन दुकानातील धान्य जे मिळत होते ते यापुढे मिळणार नाही जेणेकरून जनता अन्न अन्न करून मरावी व त्याचा आनंद सरकारला होईल असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक या नात्याने माझे मत आहे व ते सत्य आहे व ते वस्तू स्थिती वरती आधारित आहे त्यामुळे सरकारने रेशन कार्ड धारकाकडून घेणारे हमीपत्र बंद करावे व सर्व कार्ड धारकांना धान्य पुरवठा मिळावा असे वाटते.
जनहितार्थ
अधिक
जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव
अ. आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन
राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार