संपादक
नातेपुते ग्रामपंचायत च्या वतीने विशेष सभा अहिल्याबाई होळकर सभागृहात घेण्यात आली. कोरोना या रोगाच्या प्रतिबंधासाठी बैठक पार पडली. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियम घालून दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन सर्वानी करावे. तरुण मुलांनी कामाशिवाय भटकंती करू नये, जे पालन करणार नाहीत त्याच्यावरती पोलीस स्टेशन कारवाई करेल व त्यामध्ये पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये. सर्वानी नियमांचे पालन करावे. जिल्हाधिकारी यांनी नियम व अटी घालून दिलेल्या आहेत असे माजी जि.प. उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख म्हणाले. यावेळी उपसरपंच अतुल (बापू) पाटील, डॉ. एम .पी. मोरे, सपोनि मनोज सोलनकर साहेब, आरोग्य सेवक प्रवीण वरटे, ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे इ. कोरोना विषयी प्रतिबंधासाठी मार्गदर्शन केले. यावेळी अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके, प. स. सदस्य माऊली पाटील, सरपंच कांचनताई लांडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, अँड. भारत उराडे, अजय भांड, बाळासाहेब पांढरे, उत्तम बरडकर, अतुल बावकर, संदीपदादा ठोंबरे, सुखदेव ननवरे, प्रकाश साळवे, रणवीर देशमुख, गणेश उराडे, सिकंदर मुलाणी, दादा लांडगे, सोमनाथ सावंत, तलाठी प्रभाकर उन्हाळे, डॉ. अप्पासाहेब वाघमोडे, डॉ. दत्तात्रय निटवे, डॉ. शेंडगे, शिक्षक, व्यापारी, आरोग्य सेविका, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक :
मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन
भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
आठवले परिवार