Skip to main content

Posts

Showing posts from March, 2021

रेशन दुकानातील धान्य मिळविण्यासाठी जनतेकडून हमीपत्र घेणे म्हणजे भारतातील जनता उध्वस्त करणे होय

संपादक        रेशन दुकानातील गोर गरीब जनतेला मिळत असलेले धान्य त्यावरती सरकारने हमीपत्र घेण्याचे काम चालू केले आहे . रेशन कार्ड धारकांना शासनाकडून जे धान्य व इतर साहित्य मिळत होते . ते आता यापुढे बंद होईल असे चित्र दिसत आहे . शासनाने रेशन कार्ड धारकाकडून हमीपत्र घेण्याचे काम चालू केले त्या हमी पत्रात कार्ड धारक प्रामाणिकपणे माहिती देत आहेत . आज पर्यंत जसे रेशन दुकानाकडून जसा धान्यपुरवठा केला जात होता तसाच पुढेही चालू राहिला पाहिजे जेणेकरून निदान गोरगरीब त्या धान्यावरती जगू शकेल . जो गॅस धारक लाभार्थी आहे तो शासनाने ठरवलेल्या दरानुसार गॅस टाकी भरत असेल म्हणून तो श्रीमंत अथवा मध्यमवर्गीय होत नाही किंवा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे होत नाही . शासनाने रेशन कार्ड धारकाकडून नियम व अटीचे हमीपत्र भरून घेत आहे ते चुकीचे आहे . हा देशातील गोरगरिबांच्या तोंडातील घास हिसकावून घेण्यासारखा आहे . सध्याच्या काळात कोरोना सारख्या रोगाने थैमान घातले आह...

जिल्हाधिकारी यांनी सांगितलेल्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे : मा. जि. प. उपाध्यक्ष बाबाराजे (दादा) देशमुख

संपादक नातेपुते ग्रामपंचायत च्या वतीने   विशेष सभा अहिल्याबाई  होळकर  सभागृहात घेण्यात आली . कोरोना या रोगाच्या प्रतिबंधासाठी बैठक पार पडली . सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नियम घालून दिले आहेत त्याचे तंतोतंत पालन सर्वानी करावे . तरुण मुलांनी कामाशिवाय भटकंती करू नये , जे पालन करणार नाहीत त्याच्यावरती पोलीस स्टेशन कारवाई करेल व त्यामध्ये पुढाऱ्यांनी हस्तक्षेप करू नये . सर्वानी नियमांचे पालन करावे . जिल्हाधिकारी यांनी नियम व अटी घालून दिलेल्या आहेत असे माजी जि . प . उपाध्यक्ष बाबाराजे ( दादा ) देशमुख म्हणाले . यावेळी उपसरपंच अतुल ( बापू ) पाटील , डॉ . एम . पी . मोरे , सपोनि मनोज सोलनकर साहेब , आरोग्य सेवक प्रवीण वरटे , ग्रामविकास अधिकारी विक्रम मोरे इ . कोरोना विषयी प्रतिबंधासाठी मार्गदर्शन केले . यावेळी अक्षय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ कवितके , प . स . सदस्य माऊली पाटील , सरपंच कांचनताई लांडगे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढ...

राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांनी ०५/०३/२०२१ रोजी घेतलेल्या माहिती अधिकाराची सुनावणी त्यामुळे अर्जदार जोमात तर अधिकारी कोमात हे पहायला मिळाले

संपादक   आज दिनांक ०५/०३/२०२१ शुक्रवार रोजी दुपारी ३.०० वाजले पासून ज्या अर्जदारांनी राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे यांच्याकडे सन २०१७ मध्ये अपील दाखल केले होते त्या अपिलाची सुनावणी आज पार पडली. त्या सुनावणीत जनराज्य माहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी यांनी माहिती मागितलेल्या अर्जदारांना माहिती न दिल्यामुळे व अपील अधिकाऱ्यांनी अपील आदेश न काढल्यामुळे राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे सन २०१७ रोजी अपील केले होते त्या अपिलाची सुनावणी आज ऑनलाईन पद्धतीने पार पडली. हा एक चांगला योग आला. आयोगाच्या समोरासमोर जनराज्य माहिती अधिकारी, अपील अधिकारी, अर्जदार व राज्य माहिती आयोग पुणे खंडपीठ पुणे आयुक्त यांनी सुनावणी घेतली त्यामुळे अर्जदारांच्या अर्जाला वाचा फुटली. अर्जदारांना आनंद वाटला आहे. माहिती देताना राज्य माहिती अधिकारी यांनी टाळाटाळ करू नये, दप्तर दिरंगाई करू नये असे चालणार नाही व अपील अधिकारी यांनीही अपील घेताना टाळाटाळ व दप्तर दिरंगाई करता येणार नाही. या आजच्या सुनावणीने दाखवून दिले. त्याचप्रमाणे आज अर्जदारांनी व्यक्तिश: मागितलेली माहिती व्यक्तिशः दिली जावी. व्यक्तिशः दिलेली माहिती पोस्टा...