Skip to main content

Posts

Showing posts from 2026

नातेपुते पोलीस ठाणे येथे रस्ता सुरक्षा सप्ताह अनुषंगाने नातेपुते शहरात रॅलीचे आयोजन

     उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाणे कर्मचारी, पोलीस पाटील व एस.एन.डी.इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे आरएसपीचे विद्यार्थी यांनी नातेपुते शहरात रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रॅली काढण्यात आली. त्यावेळी स.पो.नि. परिस्थिती यांनी सर्व नातेपुतेकरांना मार्गदर्शन केले. शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे शिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने वाहतूक नियम समजून घेत स्वतःमध्ये शिस्त लावून घेतली पाहिजे. नागरिकांसह सर्व संबंधित यंत्रणांनी वाहतूक नियमांचे पालन करून त्याबाबत व्यापक जनजागृती करावी.  अपघात झाल्यास नागरिकांनी अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करावी. जे अपघातग्रस्त यांना तात्काळ मदत करतात, त्यामुळे अपघातग्रस्तांचे प्राण वाचते, अशा दानशूर व्यक्तीस मृत्युंजय या पदवीने सन्मानित केले जाते. कुठल्याही चौकशीला बोलवले जात नाही, सर्व प्रवास अपघात विरहित राहतील यांची दक्षता सर्व यंत्रणेने घ्यावी. प्रत्येकाने सतर्क, जागरूक राहत वाहतुकीच्या नियमांचे पालन केले गेले पाहिजे असे मत ...