उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फलटण - पंढरपूर रोडच्या साईट पट्टीमध्ये नातेपुते बायपास येथे एक बेवारस इसम वय अंदाजे 55 ते 60 वर्ष मयत स्थितीत पडून असले बाबतची माहिती तक्रारदार नामे अर्जुन हरिबा पिसाळ वय 43 वर्ष, राहणार जानकरवस्ती, नातेपुते याने पोलीस ठाणे येथे दिनांक 11/10/2025 रोजी हजर होऊन माहिती दिली की, दुपारी 02.00 वाजता फलटण-पंढरपूर, नातेपुते बायपास रोड एन एच ए 995 रस्त्याच्या साईड पट्टीतील चारीमध्ये शेती गट नंबर 259 मध्ये एक 55 ते 60 वर्षे वयाचा इसम अंगात फिकट काळसर शर्ट, फिकट निळसर फुल पॅन्ट, सडपातळ, सर्व त्वचा काळी निळी पडलेले असून मयत झालेला आहे. तसेच चार ते पाच दिवसांपूर्वी तो तेथील परिसरामध्ये वेडसर स्थितीत फिरताना दिसून आलेला असलेबाबत माहिती दिल्याने तक्रारी अन्वये अकस्मात मयताची नोंद करण्यात आलेली असून अकस्मात मैताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.पाटकुलकर नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत. घटनेची माहिती मिळता...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे