उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार
नातेपुते पोलीस ठाणे परिसरात चोरीस गेलेले व गहाळ झालेले वेगवेगळया कंपणीचे एकूण १६ मोबाईल ज्याची किंमत ३,२०,०००/- किमतीचे मूळ फिर्यादीस परत देण्यात आलेले आहे. सदर मोबाईल जप्त करण्यासाठी पोकों/ ५३२ रणजित मदने नातेपुते पोलीस ठाणे, पोकों रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर यांनी तांत्रिक विश्लेशन करुन वरील प्रमाणे मोबाईल जप्त केलेले आहेत.
मा.श्री अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक साहेब सोलापुर, ग्रा., मा.श्री प्रितम यावलकर अप्पर पोलीस अधिक्षक सोलापुर ग्रा., मा.श्री.नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब अकलुज विभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे भव्य प्रांगणात समारंभपूर्वक वरिल सर्व गुन्हयातील फिर्यादी यांना बोलावुन घेवुन त्यांना मोबाईल परत करण्यात आले.
त्यावेळी नातेपुते पोलीस ठाणेचे श्री.महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक विक्रांत डिगे, पोहेकों राहूल रूपनवर,पोहेकों राहुल रणनवरे, पोना राकेश लोहार, पोना अमोल वाघमोडे पोकॉ रणजित मदने, पोकों सोमनाय मोहिते, पोकॉ रमेश बोराटे, पोकों रमेश कर्चे, मपोकों नेहा बोंदर, मपोकों वैशाली शेंडे यांचे आभार मानले.
सदर कामगिरीमुळे नातेपुते पोलीस ठाणे हददीतील नागरीकांकडुन नातेपुते पोलीस ठाणेचे कौतुक करण्यात येत असुन नागरिकांमध्ये आंनदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.