नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये शेतकर्यांच्या जमिनीवर टाकलेले आरक्षण रद्द करण्याबाबत मा.कल्याण जाधव साहेब यांना राजकुमार हिवरकर-पाटील यांचे निवेदन
उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) नातेपुते नगरपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवर शहराच्या प्रारूप विकास आराखड्याच्या अनुषंगाने टाकलेल्या आरक्षणाबाबत नगरवासीयांकडून आलेल्या हरकतींचा नगरवासीय व लोकप्रतिनिधी या सर्वांसमोर तोडगा काढावा. यामागणीचे निवेदन कल्याण जाधव सहा. संचालक नगररचना, सोलापूर यांना शिवसेना नेते तथा विश्वस्त नातेपुते एज्युकेशन सोसायटी राजकुमार हिवरकर-पाटील यांनी दिले. नातेपुते नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना विश्वासात न घेता प्रारूप विकास आराखड्याचे आरक्षण टाकल्यामुळे काही कुटुंब भूमिहीन होणार आहेत. काही ठिकाणी ३० मीटर, १५ मीटर चे रस्ते हे नागरी वस्ती मधूनच नकाशात प्रसारित केले गेले आहेत. पिढी जात कसत असलेल्या जमिनी यावरती फॉरेस्ट, ग्रामपंचायत काळापासून केलेली घरे, बांधकामे, दवाखाने यावरती विकास नगररचनेच्या नकाशात दाखवलेले रस्ते यासह विविध प्रयोजने यामुळे नागरिकांच्या उदरनिर्वाहाच्या जागा, घरे, शेतजमिनी असलेली बांधकामे य...