उपसंपादक वैभव आठवले
नातेपुते नगरपंचायत नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी प्रथम प्राधान्य देत असून नातेपुते शहरास विकास कामाला गती देण्यासाठी जिल्हा नियोजन आराखडा, नागरी सेवा व सुविधा पुरवणे, वैशिष्ट्यपूर्ण योजना, पंधरावा वित्त आयोग या योजनेअंतर्गत नातेपुते नगरपंचायत मधील विविध विकास कामासाठी ३१ कोटी ७१ लाख रुपये एवढा निधी प्राप्त झाला असून त्यामधील काही कामे पूर्ण झाली असून त्यातील काही कामे सुरू आहेत.
यामध्ये १० कोटी रुपयांची कामे पूर्ण झाली आहेत व १५ कोटी २३ लाख रुपयेची कामे सुरू आहेत तसेच ०६ कोटी ५५ लाख रुपयेची कामे
तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय मान्यतेस पाठविण्यात आली आहेत. मंजूर कामांमध्ये रस्त्यासाठी १९ कोटी १० लाख रुपये भूमिगत गटार यासाठी ०३ कोटी १५ लाख रुपये स्वच्छालय यासाठी ऐंशी लाख रुपये स्ट्रीट लाईट साठी ०२ कोटी ६५ लाख रुपये पाणीपुरवठ्यासाठी २१ कोटी ५६ लाख रुपये सभामंडप उद्यान व इतर मंजूर कामासाठी ०४ कोटी ४३ लाख रुपये असे एकूण ३१ कोटी ७१ लाख रुपयांची काही कामे झाले असून काही सुरू आहेत.
नातेपुते नगरपंचायतीमार्फत रमाई आवास योजना २०२२-२३ यासाठी ४३ लाभार्थी प्रस्तावास मंजुरी मिळाली होती. त्यापैकी २५ बांधकाम सुरू आहेत लाभार्थीना जोते लेवलला पहिला हप्ता व बांधकाम लेंटल लेवलला दुसरा हप्ता वितरित केले आहेत व उर्वरित तिसरा ५० हजाराचा हप्ता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बांधकामाची पाहणी करून दिला जाणार आहे. सन २०२३-२४ मध्ये रमाई आवास योजना मध्ये एकूण २२ अर्ज आले होते सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून २२ प्रस्तावास मंजुरी मिळाली असून लाभार्थी कडून बांधकाम प्लॅन घेऊन बांधकाम परवाना देण्याचे काम सुरू असून नवीन अर्ज देखील स्वीकारण्याचे काम नगरपंचायत मध्ये चालू आहे. तसेच नगरपरिषद संचालनालय मुंबई यांच्याकडून प्रधान मंत्री आवास योजना अंतर्गत १२७ लाभार्थी प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. लाभार्थ्यांचे बांधकाम प्लॅन घेऊन बांधकाम परवाना देण्याचे काम चालू आहे व नवीन अर्ज देखील नातेपुते नगरपंचायत स्वीकारत आहे. थोड्याच दिवसात अग्निशामक गाडी येत आहे.
२०११ पूर्वी किंवा त्यापूर्वी निवासी करण्यासाठी केलेली अतिक्रमणे अधिकृत करून घेण्यासाठी नातेपुते नगरपंचायत जाहीर नोटीस काढून अर्ज मागून घेणार आहे तरी नातेपुते शहर भागातील अतिक्रमण धारकांनी आपली निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी नगरपंचायत यांनी जाहीर नोटीस काढल्यानंतर नगरपंचायत मध्ये निवासी अतिक्रमणे नियमित करून घेण्यासाठी अर्ज करावा.
या पत्रकार परिषदेला नातेपुते नगरपंचायतच्या नगराध्यक्षा अनीता लांडगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, मुख्याधिकारी माधव खांडेकर, बांधकाम विभाग सभापती अतुल पाटील, नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि महारुद्र परजणे, माजी नगराध्यक्ष उत्कर्षाराणी पलंगे, नगरसेवक भानूदास राऊत, राजेंद्र उराडे, अण्णा पांढरे, रावसाहेब पांढरे, सुरेंद्र सोरटे, अविनाश दोशी, नगरसेविका दीपिका देशमुख, संगीता काळे, माया उराडे, शर्मिला चांगण व पत्रकार यावेळी उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.