प्रत्येक कार्यालयात अधिकारी यांनी 'सरकारी कामात अडथळा' या कायद्यानुसार आरोप, दंड, शिक्षा याबाबत बोर्ड लावून जनतेला भीती दाखवण्याचे काम, त्या बोर्डाबरोबर अधिकारी यांनी आमची कर्तव्य यासाठी 'दफ्तर दिरंगाई कायदा २००६' या कायद्याचा बोर्ड सोबत लावावा
संपादक बहुजन भूषण वृत्तपत्र असंख्य कार्यालयात अधिकारी सरकारी कामात अडथळा या कायद्याचा बोर्ड लावून जनतेला भीती दाखवत आहेत. तो कायदा सरकारी कर्मचारी यांना वरदान ठरत आहे, त्या कायद्याचे बोर्ड, त्यामधील आरोप, दंड, शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे त्याचा आधार अधिकारी, कर्मचारी घेत आहेत. अधिकार्यांनो तुम्ही तुमच्या कार्यालयात सरकारी कामात अडथळा याचा आधार घेता. तसेच अधिकारी कर्मचारी यांनी दफ्तर दिरंगाई कायदा २००६ काय सांगतो त्याचा बोर्ड लावावा म्हणजे समजेल की, दफ्तर दिरंगाई कायदा २००६ सरकारी कामात अडथळा कायद्याला भारी पडत आहे. कोणत्याही कार्यालयात असलेला सरकारी कामात अडथळा या बोर्डासोबत दफ्तर दिरंगाई कायदा २००६ चा असा बोर्ड लावावा. कोणत्याही सरकारी कामात अडथळा याच फक्त कायद्याचा बोर्ड असेल तर त्या अधिकार्याची गय करणार नाही. अधिकार्यांनो जनतेचे तुम्ही नोकर आहेत, नोकर म्हणूनच नोकरी करावी, जनतेला मानसिक त्रास होईल असे वागू नका, दिलेल्या अर्जाचे निवारण करा, अडचण असल्यास मार्गदर्शन करा, टाळाटाळ करू नये, जातिभेद करू नये, कर्तव्यात कसूर करू नये, विलंब करू नये, खोट...