Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

नातेपुते पोलिसांनी मोटारसायकली चोरणार्‍या चोरांच्या मुसक्या आवाळल्या; पोलिसांची आदर्श कामगिरी

  उपसंपादक वैभव आठवले नातेपुते , ता.माळशिरस , जि.सोलापूर येथील पोलिस स्टेशन हद्दीतील मोटारसायकली चोरणार्‍या टोळीला अटक करून पोलिसांनी आदर्श कामगिरी केली आहे व या टोळीला जेरबंद केले आहे. यामध्ये आदित्य रामभाऊ सकट (वय-२१) , काशीनाथ दत्तात्रय लोखंडे (वय-१९) दोघे रा.विजयवाडी ता.माळशिरस यांना अटक करून व विधी संघर्षग्रस्त बालक याला ताब्यात घेवून त्यांच्याकडून तपास करून चोरी केलेल्या मोटारसायकली मध्ये बुलेट मोटारसायकल व इतर दोन बुलेट , फॅशन , स्प्लेंडर , ड्रीम युगा , प्लाटिना , एचएफ डिलक्स अशा मोटरसायकली चोरल्याचे चोरट्यांनी सांगितले त्याची एकूण किंमत ६ , २५ , ०००/- (सहा लाख पंचवीस हजार रुपये) असून सर्व मोटार सायकली जप्त करण्यात आल्या. नातेपुते पोलिस स्टेशनकडे २ मार्च २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार तपासकामी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुंजे , नातेपुते पोलिस स्टेशनचे सपोनि मनोज सोलनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकारण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तपास करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाल्यामुळे मांडवे गावातील पुणे-पंढरपूर रोड वर अहिल्याचौक ये...